जळगावात ॲक्वाफेस्टचे मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते होणार उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) द्वारा आयोजित महाराष्ट्रातील पहिला एमटीडीसी ॲक्वाफेस्ट 2024 येत्या 2 ते 4 ऑक्टोबर 2024 दरम्यान मेहरूण तलाव, गणेश घाट, जळगाव येथे होणार आहे. हा अनोखा महोत्सवाचे 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री  गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. एमटीडीसी द्वारे आयोजित हा जलक्रीडा महोत्सव जळगाव शहरातल्या नागरिकांना जल पर्यटनाचा थरारक आणि अनोखा अनुभव अगदी परवडणाऱ्या दरात होणार आहे.

 

एमटीडीसी अॅक्वाफेस्ट 2024 हा फक्त एक महोत्सव नसून महाराष्ट्रातील जल पर्यटनाला देशात अग्रगण्य बनवण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या महोत्सवात एमटीडीसी च्या जलक्रीडा पर्यटनातील अनुभवाचे आणि क्षमतेचे प्रदर्शन केले जाणार आहे. महोत्सवाचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन देणे नसून, जल पर्यटनाची जागरूकता निर्माण करणे, तरुणांमध्ये साहसी क्रीडांविषयी आवड निर्माण करणे, आणि जलसंपत्तीचे संवर्धन व जलसुरक्षेचे महत्त्व पटवून देणे आहे.

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली तसेच पर्यटन सचिव,  जयश्री भोज व पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा “ॲक्वाफेस्ट” चा पहिला महोत्सव जळगाव येथे होत आहे.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षणेः
बोट सफारीः शांत आणि सुरेख बोट राईडचा अनुभव.
सुपर फास्ट जेट स्की राईड्सः जलक्रीडांचा रोमांचक अनुभव.
सेलिंग बोटः शांत आणि रोमांचक अनुभवासाठी हवेच्या तालावर सेलिंग बोटवर सफर
कयाकिंगः तलावात सुरक्षित आणि आनंददायी कयाक राईड.
फ्लाइंग फिश राईडः साहसी प्रवाशांसाठी अनोखी राईड.
बनाना राईडः कुटुंबीयांसाठी आणि गटांसाठी खास आकर्षण.
बंपर राईडः उत्साहपूर्ण आणि थरारक अनुभव.
वॉटर झोबिंगः मोठ्या पारदर्शक बॉलमध्ये पाण्यावर चालण्याचा अनुभव.
इलेक्ट्रिक शिकाराः शांततापूर्ण आणि पर्यावरणस्नेही बोट राईड.
स्कूबा डायविंगः एमटीडीसी तज्ञांच्या देखरेखीखाली पाण्याखालील जगाचा अनुभव.

पहिल्यांदाच, जळगावमधील नागरिकांना आकर्षक आणि नाविन्यपूर्ण जलक्रीडांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. एमटीडीसी जल पर्यटनामध्ये महाराष्ट्राला अग्रणी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करत आहे आणि हा महोत्सव जलक्रीडांबद्दलचा थरारक अनुभव अगदी किफायतशीर दरात देण्यास सज्ज आहे.

एमटीडीसी च्या नेतृत्वाखालील यशस्वी जल पर्यटन प्रकल्प:
पर्यटनमंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन सचिव जयश्री भोज, तसेच मपवि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली एमटीडीसी नाशिक बोट क्लब, गणपतीपुळे बोट क्लब, आणि भारतातील सर्वात मोठे स्कूबा डायविंग प्रशिक्षण केंद्र, IISDA (Indian Institute of Scuba Diving and Aquatic Sports) ही जलपर्यटन आकर्षणे लोकप्रिय होत आहेत. ह्या जल पर्यटन केंद्रामध्ये स्थानिक मच्छीमार आणि आदिवासी युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करीत आहे.

पर्यटन विभागाचे एमटीडीसी च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे नवीन उपक्रम.

पर्यटनमंत्री  गिरीश महाजन आणि पर्यटन सचिव जयश्री भोज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मपवि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक,  मनोज कुमार सूर्यवंशी महाराष्ट्रात विविध जल पर्यटन केंद्रांचे उभारणीसाठी महत्वाकांक्षी योजना राबवित आहे. यामध्ये गोसेखुर्द (भंडारा/नागपूर), कोयना (सातारा), पेंच (नागपूर), उजानी (सोलापूर) या ठिकाणी जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करणार आहे. या प्रकल्पांचा उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये पर्यटनाचा विकास करणे आणि ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हा आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्र देशात जल पर्यटन क्षेत्रात अग्रगण्य राज्य म्हणून नावारूपाला येईल. एमटीडीसी च्या या प्रकल्पामुळे फक्त पर्यटनच नव्हे तर स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. एमटीडीसी ने मच्छीमार आणि आदिवासी युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना जलक्रीडा पर्यटनात नोकऱ्या दिल्या आहेत, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले आहे.

महानगरांमध्ये अॅक्वाफेस्टचे आयोजन
एमटीडीसी ने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये एमटीडीसी अॅक्वाफेस्ट आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या मालिकेतील पहिला जलक्रीडा महोत्सव जळगावमध्ये होणार आहे. सर्व जळगावकरांना या अद्वितीय अनुभवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जलक्रीडांचा रोमांचक अनुभव घेण्यासाठी हा एक सोनेरी अवसर आहे. एमटीडीसी च्या जल पर्यटनातील कौशल्याचे दर्शन आणि जलक्रीडांचा आनंद या महोत्सवात सहभागी होऊन घ्या.

तिकीट आणि अधिक माहितीसाठी एमटीडीसी च्या अधिकृत माध्यमांवर तसेच रोहित अहिरे, मो. ९७६९१६५८७२ व निलेश काथार, मो.९४२१३०६८७० यांच्याशी संपर्क साधा. एमटीडीसी अॅक्वाफेस्ट 2024 मध्ये सहभागी व्हा! थरार अनुभवा. साहसाचा आनंद घ्या. जल पर्यटनाचा उत्सव साजरा करा. हा उपक्रम महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, सल्लागार सारंग कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली सदरचा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.

Protected Content