मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव वन विभाग वनपरिक्षेत्रातील मुक्ताईनगर चारठाणा व माळेगांव वनउद्यान येथे विविध विकास कामांकरिता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर होणेबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्राव्दारे मागणी केली आहे.
चारठाणा ता. मुक्ताईनगर येथे सोबत जोडलेल्या यादीतील विकास कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. सदर वनउद्यान हे जळगांव वनविभाग, मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र (प्रादेशिक) नियतक्षेत्र चारठाणा राखीव वन असुन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. चारठाणा वनउद्यानात स्थानिक लोकांचे विविध कार्यक्रम, लग्नसमारंभ पार पडतात. तसेच तेथे भवानी मंदिर तसेच लक्ष्मीनारायणाचे हेमाढपंथी शैलीचे पुरातन मंदिर असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. माळेगांव वनउद्यानाच्या विकासामुळे मुक्ताईनगर तालुक्याच्या नैसर्गिक सौदर्यात भर पडेल तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत सुंदर असे पर्यटन स्थळ निर्माण होईल. तरी माळेगांव वनउद्यान, ता. मुक्ताईनगर येथे सोबत जोडलेल्या यादीतील विकास कामांकरिता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात यावा व सदर कामांची कार्यान्वयित यंत्रणा जळगांव वनविभाग यांचेमार्फत करण्यात यावी. असे निवेदनात दिले आहे.