भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात अमृत योजना रखडलेल्या अवस्थेत असून केंद्र शासनाच्या अमृत टप्पा 2.0 योजने अंतर्गत आमदार संजय सावकारे यांनी राज्य व केंद्र शासनाच्या दरबारी सतत पाठपुरावा करून 136 कोटी 79 लक्ष रुपये भुसावळ शहर पाणीपुरवठा अमृत-दोन योजनेसाठी मान्यता प्राप्त करून घेतली.
याबाबत आमदार संजय सावकारे यांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की दिनांक 16 जुलै रोजी प्रधान सचिव नवी-2 अध्यक्ष डॉ. के. एच. गोविंदराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्र पुरस्कृत अमृत टप्पा 2.0 अभियानांतर्गत गठीत राज्यस्तरीय तांत्रिक समितीने भुसावळ शहर अमृत योजनेसाठी 136 कोटी 79 लक्ष रुपये निधीची तांत्रिक मान्यता दिलेली असून लवकरच भुसावळ शहरातील रखडलेली अमृत पाणीपुरवठा योजना मार्गी लागेल आणि भुसावळ शहरातील नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली वन वन संपुष्टात येईल.
या कमी आमदार सावकारे यांनी अथक परिश्रम घेऊन वेळोवेळी प्रशासकीय तथा संबंधित मंत्रालयात मंत्र्यांसोबत बैठका घेऊन सतत त्यांनी पाठपुरावा केला आणि आज योजनेसाठी मिळालेल्या तांत्रिक मान्यतेमुळे शहरातील पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. योजनेसाठी पाठपुरावा करताना महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील तसेच खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे देखील महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले