बोदवड शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास मंजूरी; आ. चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मतदारसंघातील नगरोत्थान महाभियानांतर्गत बोदवड शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक नगरो-२०२४/प्र.क्र.४३५/नवि-३३ मंत्रालय, मुंबई- ४०००३२. दिनांक:- ०५ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या प्रसिद्ध परीपत्रकानुसार सुमारे ९५.१४ कोटीच्या निधीसह प्रशासकीय मान्यता देण्याबाबत मोठा निर्णय झाला आहे.

अवघ्या महिनाभरापूर्वी सदरील योजनेला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आ. चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने सदरील योजनेला ९५.१४ कोटी रुपयांच्या निधीसह राज्याच्या नगरोत्थान महाभियानांतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली. लगेचच निविदा प्रक्रिया होऊन महिनाभरानंतर कामास सुरुवात सुरुवात होणार आहे. अशी माहिती आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून बोदवड वासियांना तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागत असल्याने बोदवड शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे ड्रीम प्रोजेक्ट हाती घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. तर जनतेला दिलेल्या आश्वासनाचे आज फलित झाल्याने आ. चंद्रकांत पाटील यांनी अवघ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात वचन पूर्ती केल्याने बोदवड वासियांतर्फे आभार व्यक्त केले जात आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा तर आ. चंद्रकांत पाटील यांच्यासारखा असावा यांसह अभिनंदन व आभार सोशल मीडियातून व्यक्त करताना नागरिक दिसून येत आहे.

Protected Content