जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उपविभागातील गुन्हे आढावा बैठकीत गुन्ह्यांचा आढावा, समन्स वॉरंट बजावणी, प्रतिबंधात्मक कारवाई, मुद्देमाल निर्गतीयासह लोकसभा निवडणुकीत महत्वाची कामगिरी करणाऱ्यांचा पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी आढावा घेतला. तसेच यावेळी उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदारांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
जळगाव उपविभागाची गुन्हे आढावा बैठक मंगळवार दि. ११ जून रोजी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत गुन्ह्यांचा आढावा, समन्स वॉरंट बजावणी यासह सीसीटीएनएस कार्यप्रणाली व इतर मुद्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच मे २०२४ मध्ये घडलेले गुन्हे उघडकीस आणणाऱ्या अधिकारी, अंमलदारासह समन्स व वारंटची जास्तीत जास्त बजाावणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह विशेष मोहीम दरम्यान, उत्कृष्ठ कामगिरी करणारे आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या जळगाव उपविभागातील अधिकारी व गोपनिय शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, तालुका पोलीस ठाण्याचे महेश शर्मा, शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी उपस्थित होते.