Home Cities जळगाव अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेश; जिल्हा प्रशासनाचा वेगवान निर्णय !

अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेश; जिल्हा प्रशासनाचा वेगवान निर्णय !

0
176

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने गट ‘क’ संवर्गातील अनुकंपा उमेदवारांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात शिफारस प्राप्त उमेदवारांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरी सेवा मंडळाची बैठक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने नियुक्ती आदेश देण्यात आले.

चार उमेदवारांना मिळाले नियुक्ती आदेश
या बैठकीत चार अनुकंपा उमेदवारांना विविध पदांवर नियुक्ती देण्यात आली. त्यात फिरोज तुराप तडवी यांना रावेर येथील तहसील कार्यालयात वाहन चालक म्हणून, आकाश कैलास कडबाने यांना कानळदा येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून, तर गौरव सुरेश पगारे यांना भडगाव तालुक्यातील पिंपरी हाट येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. याशिवाय, प्रतीक सुधीर सोनकूळ यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आली. या नियुक्तीमुळे संबंधित कुटुंबांना मोठा आर्थिक व सामाजिक दिलासा मिळाला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, तहसीलदार (महसूल) ज्योती गुंजाळ, सहाय्यक महसूल अधिकारी वैशाली पाटील आणि महसूल सहाय्यक रियाज पटेल उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी नियुक्ती झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व उमेदवारांनी प्रशासनाच्या या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

प्रशासकीय पारदर्शकता आणि वेगवान कार्यवाही
अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी अनेकदा उमेदवारांना प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागते. मात्र, जिल्हा प्रशासनाने केवळ तीन दिवसांच्या आत मेळावा आणि नियुक्ती आदेशाची प्रक्रिया पूर्ण करून एक उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. हा निर्णय प्रशासनाच्या पारदर्शक आणि वेगवान कार्यप्रणालीचे प्रतीक आहे. त्यामुळे इतर प्रशासकीय कार्यालयांनाही यातून प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound