यावल प्रतिनिधी । यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांची संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडीचे आदेश पारीत केले आहे.
शेखर पाटील यांच्या निवडबाबत आमदार शिरीष चौधरी आणि आमदार लता सोनवणे यांनी नामनिर्दशीत केलेल्या पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपन पाटील यांच्या नावाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शिफारसीने जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांनी त्यांची संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवडीचे आदेश पारीत केले आहे.
दरम्यान या समितीच्या इतर समितीचे सदस्यांमध्ये राजु तडवी, योगिता पाटील, ज्ञानेश्वर बऱ्हाटे, तुषार उर्फ मुन्ना पाटील, दिनकर पाटील, नितिन महाजन, सैय्यद जावेद अली अहमद महमंद अली, संदीप सोनवणे, सुभाष साळुंके तर शासकीय प्रतिनिधी म्हणुन तहसीलदार महेश पवार तथा गटविकास अधिकारी राहणार आहे. शेखर पाटील यांची निवड झाल्याबद्दल आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस कमेटीचे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, धनंजय चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, हाजी गफ्फार शाह, मारूळचे जिया सर , कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, अभय महाजन, धिरज कुरकुरे, उमेश जावळे, राजु करांडे, विक्की पाटील आदींनी अभीनंदन केले आहे.