चोपडा/यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील माहेर असलेल्या व धुळे जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या नंदीनी पाटील यांची राष्ट्रीय सरपंच संघटनेच्या धुळे महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नंदिनी पाटील या चोपड्या तालुक्यातील वर्डी येथील सामाजीक कार्येकर्ते शेखर पंढरीनाथ पाटील(साळुंके) यांच्या पुतणी तर प्रदिप पंढरीनाथ पाटील यांच्या कन्या आहेत. नंदिनी पाटील या विवाहानंतर अवघ्या ७ ते ८ महिण्यातच झालेल्या निवडणूकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. नंदिनी पाटील यांची सरपंच संघटनेच्या महिला जिल्हाअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वर्डी येथील ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला. अमरावती येथे संपन्न झालेल्या सरपंच परिषदच्या राज्यस्तरीय मेळाव्यात नंदीनी पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
अमरावती येथे राष्ट्रीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयराम पलसानिया यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांचीही नियुक्ती करण्यात आली. सरपंच नंदिनी पाटील यांनी दभाशी ग्रामपंचायतीला महावितरण कंपनीने ठोठावलेला होता. ८४००० रूपयांच्या दंडाची रक्कम आपल्या गळ्यातील मंगळसुत्रासह इतरही सोन्याचे दागीणे गहान ठेऊन भरली व ग्रामस्थांनी पाण्यासह विजपुरवठाही सुरळीत करून दिला होता त्यांच्या या कार्याचे सर्व पातळीवर विशोष कौतुक करण्यात आले होते. तसेच केंन्द्रशासनाच्या अटल आहार योजने अंतर्गत आदर्शगाव दभाशी येथील संघटीत व असंघटीत कामगार यांचे विस्कळीत दैनंदिन जिवनात हातभार लावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून व आमदार जयकुमार रावल यांच्या सहकार्याने गावातील ग्रामस्थांना दोन्ही वेळचे भोजन निःशुल्क स्वरूपात दिले जाणार आहे नुकतेच रविवार २९ रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच नंदिनी पाटील यांनी राबविलेल्या अश्या अनोख्या कामांची दखल घेऊन त्यांच्यावर धुळे महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दभाशी सरपंच नंदिनी पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर जिल्ह्यातील सरपंचांना एकत्र आणून गावातील विविध विकासात्मक कामे करण्यासाठी शासन स्तरावरील मागण्या सोडवण्याचा निर्धार यावेळी नंदिनी पाटील यांनी व्यक्त केला आहे.