भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी च्या अंत्योदय आघाडीच्या जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष पदी तालुक्यातील पिचर्डे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते धनराज भिकन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर पाटील यांनी केली.
पिचर्डे येथील धनराज पाटील यांनी विदयार्थी दशेमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सारख्या संघटनेचे काम केले. तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असताना निसर्ग मित्र समितीचे भडगाव तालुका अध्यक्ष म्हणून ही काम केले आहे. उच्चशिक्षक, अभ्यासु व्यक्तीमत्व, साधा सरळ स्वभाव असलेले युवक म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते. या सर्व कार्याची दखल घेऊन एका सर्वसामान्य कार्यकर्ताला अंत्योदय आघाडी सारख्या महत्वाच्या पदाची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी भारतीय जनता पार्टी ने दिली आहे. त्यांच्या नियुक्तीने ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष ह भ प जळकेकर महाराज पाटील, खा उन्मेष पाटील, आ मंगेश चव्हाण, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी, विधानसभा निवडणुक प्रमुख अमोल शिंदे, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, अमोल पाटील, लखीचंद पाटील, अनील पाटील, जगदिश पाटील सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.