पहिल्यादाच महिला मुख्य सचिवपदी नियुक्त ! सुजाता सौनिकांनी घडवला इतिहास

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. नितीन करीर यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले होते. आज (रविवार) संध्याकाळी ५ वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

विशेष म्हणजे सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनीदेखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. सुजाता सौनिक यांनी याआधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदी बढती मिळाली आहे. सुजाता सौनिक मुख्य सचिवपदी केवळ एक वर्षे राहणार आहेत. जून २०२५ मध्ये त्या सेवानिवृत्त होणार आहेत.

Protected Content