Home धर्म-समाज लोक संघर्ष मोर्चातर्फे विविध समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोक संघर्ष मोर्चातर्फे विविध समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन


nivedan 1

भुसावळ, प्रतिनिधी | महाजनादेश यात्रेनिमित्त आज (दि.२४) येथे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोक संघर्ष मोर्चातर्फे विल्हाळे व परिसरातील ग्रामस्थांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

या निवेदनात प्रलंबित वनदाव्यांचा त्वरित निपटारा करून संबंधीताना ७/१२ चा उतारा मिळावा, प्रलंबित वनदावे धारकांना ‘शेतकरी सन्मान निधी मिळावा, भुसावळ येथे महामार्ग चौपदरीकरणात घरे जात असलेल्या १०० रहिवाशांना मौजे मीरगव्हाण शिवारातील जागा मंजूर करावी, दीपनगरच्या राखेने प्रदूषित होणारी विल्हाळे येथील नदी, तलाव व जंगल राखमुक्त करून स्थानिकांना त्यावर अधिकार द्यावा, त्यांचा सामुहिक वन हक्काचा दावा मंजूर करावा, प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा. तसेच विल्हाळे व फुलगाव येथे हातभट्टीसह सगळी दारू बंद करून ग्रामरक्षक दल निर्माण करावे. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, चंद्रकांत चौधरी व सचिन धाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Protected Content

Play sound