मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने बजावले आहेत.
अमरावतीच्या खा.नवनीत राणा आणि आ.रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे आव्हान दिले होते. या प्रकरणी शिवसैनिकानी आक्रमक होत मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी पहारा दिला होता. तर वांद्रे परिसरातील राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेरही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते.
यासंदर्भात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपांखाली राणा दामपत्यावर मुंबई पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच दोघांनी पोलिसांना सहकार्य न करता उलट अरेरावी केली असल्याचा आरोप असून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणांवर दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी खा.नवनीत राणा आणि आ.रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असून ८ जूनला राणा दामप्त्याला चौकशीसाठी मुंबईत वांद्रे न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आहे.