जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर पोलीस ठाण्यात गेल्या १० ते १५ वर्षांपासून बेवारस स्थिती पडून असलेल्या वाहनांची खात्री करून नागरीकांनी लवकरात लवकर घेवून जावे, तदनंतर सर्व वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांनी प्रसिध्दपत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव शहर पोलीस ठाण्यात अनेक वर्षांपासून आवारात बेवाररित्या पडून आहेत. सर्ववाहनांबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या नोटीस बोर्डावर वाहन क्रमांक व चेसीस क्रमांकासह लावण्यात आलेले आहे. ज्या कोणी नागरीकांचे वाहन जळगाव शहर पोलीस ठाण्यात जमा असेल त्यांनी खात्री कयन घेवूवन वाहन मालकी हक्काबाबतचे मुळे कागदपत्रे दाखवून आपापले वाहन घेवू जाता येणार आहे. दरम्यान कागदपत्रे नसलेल्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून मुल्यांकन करून कार्यकारी दंडाधिकारी यांच्या मान्यतेने सदरील वाहनांना लिलाव करण्यात येणार असल्याच्या सुचना पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांनी प्रसिध्दीपत्रकान्यये कळविले आहे.