अमळनेर (प्रतिनिधी) अपंग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने पुणे येथील अपंग कल्याण आयुक्त यांना नुकतेच विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी नवीन आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांचे स्वागत देखील करण्यात आले.
कॉस्ट्राईब अपंग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने पुणे येथे अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांना नुकतेच विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच त्यांचे स्वागत तथा सत्कारही करण्यात आला. यावेळी माननीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आलेल्या निवेदनात सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच विनाअनुदानित शाळांना अनुदान देणे,बंद पडलेल्या जणांचे कर्मचाऱ्यांचे समायोजन,कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन,अनुकंप भरती,डीसीपीएस अप्रोलचे अधिकार समाजकल्याण अधिकारी जिसका यांना देण्यात यावे, यासह इतर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आयुक्त देशभ्रतार यांनी या गोष्टी याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी कार्याध्यक्ष भालेराव यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी ओळख करून दिली व आभार मानले. तर या प्रसंगी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष तुषार भालेराव व संघटनेचे ज्येष्ठ व तज्ञ मार्गदर्शक सुरेश तांबे,एस.पी.महालेंसह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.