जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अनोळखी मयत महिला आणि एका पुरुषाची प्रेते राखून ठेवण्यात आली आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये मयतांची ओळख अजूनही पटलेली नसून, रेल्वे पोलिस जळगाव यांनी नागरिकांना त्यांची ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.



१७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.४० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून, ती लाल रंगाचे ब्लाऊज आणि राखाडी रंगाची विविध फुलांची साडी परिधान केलेली होती. तिचे केस काळे व वाढलेले होते, तर शरीर सडपातळ व सावळ्या रंगाचे होते. तिचा चेहरा सुजलेला होता.
या महिलेची हकीकत अशी आहे की, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी भुसावळ रेल्वे स्टेशनवरील दक्षिण बुकिंग ऑफिसच्या रॅम्पवर ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने औषधोपचारासाठी ट्रॉमा सेंटर हॉस्पिटल भुसावळ येथे दाखल करण्यात आले. तेथून तिला रेफर करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.४० वाजता ती नैसर्गिकरित्या मरण पावली. तिच्या मृत्यूचे कारण कोणतातरी आजार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या महिलेची ओळख अजूनही पटलेली नसून, तिच्या नातेवाईकांना किंवा तिच्याबद्दल माहिती असलेल्या व्यक्तींना रेल्वे पोलिस चौकी जळगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


