अमळनेर प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बांधण्यात येणार्या अनधिकृत गाळ्याच्या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद निकम यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद निकम यांनी माहिती देतांना सांगितले की, येथील बाजार समितीमध्ये शेतकर्यांची समस्या जाणून घेत असताना अतिशय विचित्र प्रकार पाहण्यास मिळाला. नगररचनेच्या आराखड्यानुसार जे शेतकरी व व्यापारी यांच्या सोयींसाठी सुलभ शौचालय बांधण्यात आले होते. त्या समोर अनधिकृत पद्धतीने दुकान गाळे बांधले जात आहेत. याबाबत तेथे जाऊन विचारणा केली असता मागच्या बाजूच्या शौचालयात जाण्यास फूटभर जागा सोडू असे सांगण्यात आले आहे. संबंधीत गाळे सुमारे१५ लाखात विकण्याची चर्चा कानावर आली असून यात सभापती,सचिव व काही संचालक यांच्यासह विरोधकांचे सुद्धा हात ओले तर नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या प्रकरणी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी बिग्रेडचे तालुका अध्यक्ष आनंद निकम यांनी दिला आहे.