जळगाव प्रतिनिधी । भरधाव ॲपेरिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून इतर दोघेजण जखमी झाल्याची घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. जखमी महिलेचा समावेश आहे. याबाबत जामनेर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, धनराज सिताराम पाटील (वय-55) रा. गोजोरे ता. भुसावळ हे आपल्या पत्नीसह साडूचा मुलगा रून्मय विजय बरकले रा. कुऱ्हे पानाचे येथून फत्तेपूर तालुक्यातील किन्ही येथे दुचाकीने गोजोरे येथून वाकडी मार्गे जात असतांना समोरून येणाऱ्या अज्ञात ॲपेरिक्षाने जोरदार धडक दिली. या धडकेत तिघे जण गंभर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जामनेर रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असताना वैद्यकिय अधिकारी यांनी धनराज पाटील यांना मृत घोषीत केले, तर पत्नी आणि रून्मय हे जखमी झाले. जखमींना जळगावातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.