पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अंतुर्ली येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक रणजित पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
तर व्हा. चेअरमनपदी भगवान पाटील यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी भडगाव फ्रुट सेलचे संचालक शामराव पाटील, वि. का. सोसायटी संचालक प्रदीप पाटील, मनोज पाटील, अॅड. प्रवीण पाटील, दिनकर पाटील, संजय पाटील, शिवाजी पाटील, लक्ष्मण पाटील, माधुरी पाटील, साहेबराव पिंपळे, दादाभाऊ गोसावी यासह भास्कर पाटील, बबन पाटील, रामचंद्र पाटील, रंगराव पाटील मनोज पाटील, दादाभाऊ बनकर, प्रवीण पाटील, नितीश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.