Home आरोग्य मुक्ताईनगर सेंट्रल बँक शाखेत ग्राहकांची अॅन्टीजन चाचणी : दोघे ...

मुक्ताईनगर सेंट्रल बँक शाखेत ग्राहकांची अॅन्टीजन चाचणी : दोघे पॉझिटिव्ह

0
58


 

 मुक्ताईनगर, प्रतिनिधी । येथील सेन्ट्रल बँक शाखेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्राहकांची अॅन्टीजन  चाचणी करण्यात आली असता दोन ग्राहक हे कोरोना  पॉझिटिव्ह आढळून आलेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन घोषित केलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मुक्ताईनगर येथील सेंट्रल बँकेत येणाऱ्या ग्राहकांची नगर पंचायत कर्मचारी व मुक्ताईनगर पोलीस यांच्यातर्फे रॅपिड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात ३७  ग्राहकांची टेस्ट करण्यात आली, या पैकी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यांना कोरोना सेंटर येथे भरती करण्यात आले. तसेच  बँक ग्राहकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे व मास्क घालूनच बँकेत यावे तसेच आजपासून बँकेचे व्यवहार सकाळी ११ ते २  पर्यंत होतील असे सेंट्रल बँकेतर्फे उपव्यवस्थापक गौरव डांगे यांनी सांगितले.


Protected Content

Play sound