यावल वनविभागातील वैजापूर येथे अंतरसिंग आर्य यांचा दौरा संपन्न

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यावल वनविभाग जळगांव मधील वैजापुर वनक्षेत्र तसेच वैजापुर परिसरात अंतरसिंग आर्य, अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, दिल्ली यांचा प्रशासकीय दौरा संपन्न झाला. यावेळी वैजापुर वनक्षेत्रातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांनी त्यांना मानवंदना दिली. अध्यक्ष आणि इतर मान्यवर यांनी वैजापुर वनक्षेत्र परिसरात एक पेड माँ के नाम अभियान अंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम करुन सहभाग नोंदविला. झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे याबाबत अध्यक्ष सो यांनी त्याप्रसंगी सर्व आदिवासी बांधवांना आवाहन केले. त्यानंतर वनविभाग व आदिवासी विकास विभाग यांनी एकत्रितरित्या जन संवाद कार्यक्रम चे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमास आदिवासी बांधव मोठया संख्येने उपस्थित राहून त्यांनी प्रश्न उपस्थित करुन मा. महोदय यांच्याशी चर्चा केली.

नंतर वैजापुर वनक्षेत्रातील परिमंडळ वैजापुर कक्ष क्र. २३० मधील प्रथम वर्ष क्षेत्र २० हेक्टर बांबु रोपवन पाहणी केली. तेथील स्थानिक कर्मचारी यांनी बांबूचे महत्व आणि निसर्गातील योगदान याबाबत महोदय यांच्याशी वार्तालाप झाला. त्यांनी सदर कामाबाबत समाधान व्यक्त केले. डॉक्टर चंद्रकांत बारेला, सामाजिक कार्यकर्ता यांनी वनविभाग आणि वनविभागातील कर्मचारी व अधिका- यांबददल जंगल संरक्षणाच्या बाबतीत प्रशंसा व्यक्त केली. मा. श्री अंतरसिंग आर्य, अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, दिल्ली यांच्या कडून गावातील व परिसरातील लोकांना जंगल रोजगार निर्मितीचे कामांचेही आश्वासन देण्यांत आले. अनुसुचीत जमाती व इतर पारंपारीक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६, नियम २००८ चा कलम ३ (२) मध्ये नमुद केलेल्या १५ बाबींपैकी (क) मध्ये नमुद केलेल्या शाळा या बाबीसाठी मौजे कृष्णापुर ता चोपडा या शासकीय आश्रम

शाळेच्या ईमारत बांधकामासाठी वनविभागाचे कक्ष क्र.२५१ मध्ये एकुण ०.९२ हेक्टर क्षेत्रासाठी मंजुरी देण्याबाबतचे पत्र जमीर मुनीर शेख, म. उपवनसंरक्षक सो यावल वनविभाग जळगांव यांच्या हस्ते अरुण पवार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांना देण्यांत आले. सदर कार्यक्रम प्रसंगी हा जमीर मुनीर शेख, म. उपवनसंरक्षक सो यावल वनविभाग जळगांव तसेच वेवोतोलु केजो प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव, प्रथमेश वि.हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक चोपडा व समाधान एम. सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापुर (प्रा.) व वैजापुर वनक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content