जळगाव प्रतिनिधी । कोवीड आपत्तीच्या काळात कोवीड रूग्णांना लागणारे रेमडीसीवीर इंजेक्शन ज्यादा दराने विक्री करणाऱ्या मुर्शरफ खान मसुर खान (वय-२६) रा. मासुमवाडी या तरूणाला सिंधी कॉलनीतून जिल्हा पेठ पोलीसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली आहे. जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यात कोवीड रूग्ण सातत्याने वाढत आहे. कोरोना बाधित रूग्णांसाठी लागणारे रेमडीसीवीर इंजेक्शनचा जळगाव जिल्ह्यात मोठा काळाबाजार करून जादा भावाने विक्री होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावण्यात आले आहे. जिल्हा पोलीस यंत्रणा देखील सतर्क आहे. दरम्यान गेल्या आठवड्यापासून शहरात दीड हजार रूपयाला मिळणारे रेमडीसीवी इंजेक्शन काळाबाजारात २० ते २५ हजारापर्यंत व्रिकी होत असल्याचे खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी पोलीसांनी इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या १२ जणांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी सांयकाळी शहरातील सिंधी कॉलनी परिसरात एक तरूण रेमडीसीवीर इंजेक्शन चढ्या भावाने विक्री करत असल्याची माहिती जिल्हा पेठ पोलीसांनी मिळाली. त्यानुसार सपोनि महेंद्र वाघमारे आधि पो.ना. प्रशांत पाठक यांनी सापळा रचून सायंकाळी ४ वाजता संशयित आरोपी मुर्शरफ खान मसुर खान (वय-२६) रा. मासुमवाडी जळगाव याला अटक करून त्याच्या ताब्यातील ५ हजार ४०० रूपये किंमची रेमडीसीवीर इंजेक्शन हस्तगत केले आहे. याप्रकरणी प्रशांत पाठक यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.