जळगाव, प्रतिनिधी | समस्त बारी पंचची आज रविवार ५ जानेवारी रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा शिंपी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
समस्त बारी पंच यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीचा वार्षिक अहवालाचे अनावरण समाजातील बालगोपालांच्या हस्ते करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष लतिष सुभाष बारी यांनी केले. कार्यक्रमांचा मागील वर्षांचा आढावा सचिव सुनिल अशोक बारी यांनी सादर केला. तसेच समाजाचे प्रयत्नावीत नवीन समाज मंगल कार्यालयाविषयी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष विजय काशिनाथ बारी यांनी दिली. त्यानंतर जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधिचे अहवाल वाचन मंडळाचे खजिनदार बालमुकुंद शांताराम घायल यांनी केले. येणाऱ्या काळात मंडळाचे ध्येय आणि धोरणे, तसेच नविन संकल्पना समाजासमोर मंडळाचे सहखजिनदार हर्षल शालिग्राम बारी यांनी मांडले. २०२० या वर्षामध्ये समाजातर्फे घेण्यात येणाऱ्या नियमित कार्यक्रमांची रूपरेषा मंडळाचे सहसचिव मयुर श्रावण बारी यांनी मांडली.त्यामध्ये नविन महिला मंडळ कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये इंदू विठ्ठल बारी अध्यक्षा तर सिमा शिरीष बारी उपाध्यक्षा आणि दिप्ती गणेश बारी यांची सचिवपदी नियुक्त करण्यात आली. सभेमध्ये, लग्नावरील अनावष्यक खर्च, टाळणे, लग्न वेळेवर लावणे, हुंडा पद्धत या विषयी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच समाजात लग्नखर्चात होणाऱ्या खर्चामधून किमान १ टक्का खर्च समाजातील गरिब व होतकरु विद्यार्थ्यांनसाठी करावा असे अवाहन करण्यात आले. अलीकडील अपाघाताचे वाढते प्रमाण, आणि तापमान बाघता लग्न अथवा इतर कार्यक्रमाचे आमंत्रण पत्रिकेवरच अवलंबून न राहता सोशल मिडीयाच्या माध्यमांव्दारे दिला जाणाऱ्या संदेशांचा आमंत्रण म्हणून स्विकार करावा हे ही निश्चत करण्यात आले. सुत्रसंचालन सहप्रसिध्दीप्रमुख महेंद्र घनश्याम खलसे यांनी केले. तसेच समाजातील लोकांच्या शंका, समस्यांचे निराकरण करण्यात आले. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी समाजबांधवांची उपस्थिती लाक्षणिक होती. विशेष करुन समाजातील महिला व युवा वर्ग यांनी चर्चा सत्रात मोलाची भुमिका बजावली. आभार मंडळाचे सदस्य विजय पुना बारी यांनी मानले. यशस्वीतेसाठी अरूण बारी, पवन बारी आणि नितीन बारी यांनी कामकाज पहिले. तसेच बारी युवा प्रकोष्ट जळगाव, बारी युवा प्रकोष्ट नाशिक, नागवेल प्रतिष्ठान
जळगाव यांच्यासहकार्य लाभले.