महापालिका निवडणुकीत ‘शिवसेना-उबाठा’ची स्वबळावर लढण्याची घोषणा !

नागपूर – वृत्तसेवा । आगामी महापालिकांच्या सर्व ठिकाणी शिवसेना-उबाठा पक्ष स्वबळावर लढणार असल्याची महत्वाची घोषणा आज खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

आगामी काळात मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि पक्षवाढीला बळ मिळावे म्हणून या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आघाडीमध्ये असताना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे.
राऊत यांच्या घोषणेमुळे महाविकास आघाडी मध्ये फूट पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content