यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने ग्राम पंचायत कोरपावलीच्या वतीने मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विशेष बाब म्हणजे महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती आणि समाज बांधव व विविध क्षेत्रातील पदाधिकारी हे मोठ्या प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्रामपंचायत कोरपावली सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष विलास नारायण अडकमोल यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण केला तसेच अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आपल्या विचारातुन सर्वां समोर मांडले. अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्याही जातीधर्मीचा धर्माचा विचार न करता सर्वांसाठी कसे कार्य केले. याबाबत सविस्तर माहिती दिली जेव्हा त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचे खरे नाव विचारले असता त्यांचे खरे नाव कुणालाही सांगता आले नाही ही खंत त्यांनी बाळगली व अण्णाभाऊ साठे यांचे खरे नाव जे की डॉ. तुकाराम भाऊराव साठे हे सांगितले. या कार्यक्रमाला उपसरपंच यांचे पुत्र मुख्तार पटेल व ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, जुम्मा तडवी, नथू मेंबर तसेच कोरपावली विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे व त्यांचे सहकारी तसेच समाज बांधव हे उपस्थित होते. यावेळी आयोजकांनी कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मानले.