राळेगणसिध्दी । गत काँग्रेस सरकारप्रमाणे मोदी सरकार देखील आपल्याला उपोषणासाठी जागा देण्यास टाळाटाळ करत असून ”आता जागा मिळेल तिथे उपोषण करेल” असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
ज्येष्ठ नगरसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून कृषी कायद्यांबाबत सुरू असणार्या आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करतांना नाराजी व्यक्त केली आहे. यात म्हटले आहे की, तत्कालीन काँग्रेस सरकारनंही अशाच सुडाच्या भावनेनं उपोषण करून नये म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलं होतं. मात्र, हे त्यांना चांगलंच महागात पडलं. जनतेनंच त्या सरकारला धडा शिकविला. त्यामुळं आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात सध्याच्या सरकारनंही राहू नये. उपोषणासाठी जागा दिली नाही तर मागीलप्रमाणे जागा मिळेल तिथं उपोषण करीन, असं अण्णा हजारे यांनी सांगितले.
सरकारचे देशभर वर्चस्व वाढलेलं आहे. त्यावेळच्या सरकारप्रमाणे होणे थोडंसं अवघड आहे. या सरकारलाही तेच वाटत असेल की आमचं कोण काय करू शकतं. मात्र, मतदार हा राजा आहे. त्यांनी मनात आणलं तर काहीही होऊ शकतं. शांतता आणि असंहिसेच्या मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळं काहीही झालं तरी या महिन्याच्या अखेरीस आपण आंदोलन करणार, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.