जळगाव प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाअंतर्गत “अन्न भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धती” या विषयावर शनिवार 21 रोजी मु.जे. महाविद्यालयातील जुना कॉन्फरन्स येथे सकाळी 10 वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन आयुक्त डी. के. सोनवणे यांच्याहस्ते होणार आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी विवेक पाटील यांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे. विविध अन्न पदार्थातील भेसळ ओळखण्याच्या सोप्या पद्धतीचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले असून सर्व विद्यार्थी व शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग प्रमुख राठोड व समन्वयक जयश्री शिंदे यांनी केले आहे.