अंजली दमानियांना मुक्ताईनगर कोर्टातून समन्स जारी

judge hammer

मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे बदनामी प्रकरणातील अंजली दमानिया यांनी साक्षीदार रमेश ढोले आणि निवृत्ती यांना धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी अंजली दमनिया यांच्यावर मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुक्ताईनगर न्यायालयाने अंजली दमानिया यांना समन्स जारी करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माजी मंत्री आमदार एकनाथराव खड़से बदनामी प्रकरणी मुक्ताईनगर कोर्टात फौजदारी खटला अंजली दमानीया यांच्यावर दाखल आहे. सदर खटल्यात दमानीया यांना वारंट असल्याने 12 नोव्हेंबर 18 रोजी कोर्टात आल्या असताना कोर्टाचे कामकाज झाले. न्यायालयातील कामकाज झाल्यानंतर साक्षीदार रमेश ढोले, निवत्ती पाटील व इतर बाहेर येत असताना अंजली दमानीया यांनी विनाकारण दमदाटी करून शिवीगाळ केली व धमकी दिली. ते म्हणाले होते की, तुम्ही माझ काही करू शकणार नाही, पोलीस मशीनरी माझ्या हातात आहे, तुम्ही दलाल्या करतात, तुमचे धंदे मला माहित आहे, मुम्बई ला आले तर तुम्हाला परत जाऊ देणार नाही. असे झाल्यानंतर धमकी नंतर साक्षीदार रमेश ढोले, निवृत्ती पाटील यानी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन ला एनसीआर क्र 542/18 दिली व पोलिसांनी कारवाई न केल्याने खाजगी खटला दाखल केला होता. त्याची रीतसर सुनावणी होऊन मुक्ताई नगर न्यायालयाने आरोपी अंजली दमानीया विरुद्ध भादवी कलम 504, 506 नुसार प्रोसेस जारी केली आहे. आत पुढील सुनावणी 5 एप्रिल 2019 रोजी होणार आहे.

फिर्यादीतर्फे अॅड.उमेश जवरे व ॲड. काळे यानी काम पहिले
. अंजली दमानीया विरुद्ध भाजपा कार्यकर्ते यानी जवळ जवळ 40 ठिकाणी एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी खटले दाखल केलेले आहेत. त्यापैकी जवळ 6 ते 7 ठिकाणी प्रोसेस कोर्टाने जारी केली आहे. नुकताच रावेर कोर्टात जामीन न दिल्यास कोर्टाने पुढील योग्य ते आदेशानुसार कारवाई करण्याचे संकेत दिले होते. अनेक ठिकाणी वारंट जारी झालेले आहे व अनेक खटल्यात समन्स जारी तर काही ठिकाणी सुनावणी सुरू आहे.

Add Comment

Protected Content