वंचित बहुजन आघाडीकडून जळगाव मतदार संघात अंजली बाविस्कर

मुंबई/जळगाव (प्रतिनिधी) काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीची घडी न बसल्याने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केली आहे. त्यानुसार जळगाव लोकसभा मतदार संघासाठी अंजली रत्नाकर बाविस्कर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, आज एकूण ३७ उमेदवारांची यादीच जाहीर केलीय. दरम्यान, अकोला आणि सोलापूरचा उमेदवारही लवकरच निश्चित होईल, असे आंबेडकर यांनी सांगितले. तर  रावेर मतदार संघासाठी आंबेडकर यांनी याधीच जळगाव दौऱ्यावर असतांना नितीन कांडेलकर यांचे नाव जाहीर केले होते.

 

प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्याच झटक्यात केवळ ११ मतदारसंघ वगळता, ३७ उमेदवारांची घोषणा करून टाकलीय. तर एमआयएमला विश्वासात घेऊन मुंबईतील तीन जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असे आंबेडकर म्हणाले. तसेच, अकोला आणि सोलापूरचा उमेदवारही लवकरच निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघासाठी आंबेडकर यांनी याधीच जळगाव दौऱ्यावर असतांना नितीन कांडेलकर यांचे नाव जाहीर केले होते. जळगाव लोकसभेच्या उमेदवार अंजली रत्नाकर बाविस्कर या क्षत्रिय अहिर शिंपी समाज अखिल भारतीय मध्यवर्ती संस्था महिला आघाडीच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष असून त्यांना सावित्रीबाई गौरव राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे.

 

वंचित बहुजन आघाडीचे ३७ उमेदवाराची नावं आणि मतदार संघ

 

१. वर्धाः धनराज वंजारी
२. रामटेकः किरण रोडगे-पाटनकर
३. भंडारा-गोंदियाः एन. के. नान्हे
४. गडचिरोली-चिमूरः डॉ. रमेश गजबे
५. चंद्रपूरः अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे
६. यवतमाळ-वाशिमः प्रो. प्रवीण पवार
७. बुलडाणाः बळीराम सिरस्कार
८. अमरावतीः गुणवंत देवपारे
९. हिंगोलीः मोहन राठोड
१०. नांदेडः प्रा. यशपाल भिंगे
११. परभणीः आलमगीर खान अखिल मोहम्मद खान
१२. बीडः प्रा. विष्णू जाधव
१३. उस्मानाबादः अर्जुन सलगर
१४. लातूरः राम गारकर
१५. जळगावः अंजली रत्नाकर बाविस्कर
१६. रावेरः नितीन कांडेलकर
१७. जालनाः डॉ. शरदचंद्र वानखेडे
१८. रायगडः सुमन कोळी
१९. पुणेः अनिल जाधव
२०. बारामतीः नवनाथ पडळकर
२१. माढाः अ‍ॅड. विजय मोरे
२२. सांगलीः जयसिंग शेंडगे
२३. साताराः सहदेव एवळे
२४. रत्नागिरी-सिंधुदुर्गः मारुती रामचंद्र जोशी
२५. कोल्हापूरः डॉ. अरुणा माळी
२६. हातकणंगलेः अस्लम बादशाहजी सय्यद
२७. नंदुरबारः दाजमल गजमल मोरे
२८. दिंडोरीः बापू केळू बर्डे
२९. नाशिकः पवन पवार
३०. पालघरः सुरेश अर्जुन पडवी
३१. भिवंडीः डॉ. ए. डी. सावंत
३२. ठाणेः मल्लिकार्जुन पुजारी
३३. मुंबई दक्षिणः डॉ. अनिल कुमार
३४. मुंबई दक्षिण मध्यः डॉ. संजय भोसले
३५. ईशान्य मुंबईः संभाजी शिवाजी काशीद
३६. मावळः राजाराम पाटील
३७. शिर्डीः डॉ. अरुण साबळे

Add Comment

Protected Content