मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ३७ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील एक नाव जळगाव जिल्हयातील अमळनेरचे आमदार मंत्री अनिल पाटील यांचे आहे. अनिल पाटील हे अजित पवारांच्या जवळचे मानले जातात.
अजित पवार महायुतीसोबत गेल्यानंतर त्यांना आमदारकीची पहिली टर्म असतानाही मंत्री करण्यात आले. सध्या अनिल पाटील हे महाराष्ट्र शासनाचे मदत आणि पूर्नवसन मंत्री आहेत. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीत असणाऱ्या मित्रपक्षाच्या कोणत्याही नेत्याचा समावेश नाही आहे.