जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून अनिल महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार, गुलाबराव देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आधिकृत समन्वयक म्हणून पक्षाचे प्रदेश संघटक-सचिव अनिल महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
उमेदवार गुलाबराव आप्पा देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ दैनंदिन सर्व कामकाजामध्ये लक्ष घालणे व त्याचप्रमाणे प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधून दैनंदिन घडामोडीचा अहवाल द्यावा, असे आदेश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील यांनी दिले आहेत. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी सहीनशी नियुक्तीपत्र दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी मीडियाला प्रसिद्ध केले आहे.