पाचोरा प्रतिनिधि । रेल्वे अपघातात जखमी झालेले येथील तहसील कार्यालयातील शिपाई अनिल जंजाळे यांची मृयूसोबतची झुंज अपयशी ठरली असून त्यांनी सायंकाळी शेवटचा श्वास घेतला.
याबाबत वृत्तांत असा की, पाचोरा रेल्वे स्टेशन वर दि. ९ फेब्रुवारी रोजी अपघात जखमी झालेले अनिल विठ्ठल जंजाळे (वय ५४) यांच्यावर येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या वरच्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या होत्या. मात्र दि. १ मार्च रोजी सायंकाळी त्यांचा २२ दिवसांचा मृत्यूशी झुंज देणारा प्रवास अखेर संपला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि. २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सरकारी निवास स्थान, उल्हास टॉकीज मागे, संभाजी नगर येथुन त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे