जळगाव जिल्हा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सरचिटणीसपदी अनिल गाढेंची नियुक्ती

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगावच्या जिल्हा सरचिटणीस पदी जळगाव जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक अनिल डी गाढे यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी नाशिक विभागाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे तसेच महासंघाचे जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार , शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंके , जलसंपदा विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे, मनपा विभागाचे अध्यक्ष सुरेश भालेराव , महासंघाचे कार्याध्यक्ष योगेश अडकमोल , राजीव वानखेडे , नितीन सोनवणे , गोपीचंद भालेराव , देविदास भास्कर , देवानंद सोनवणे , साधना बाविस्कर , किशोर साळुंके , नंदकुमार गायकवाड, चंद्रकांत भालेराव , गौतम अहिरे , विष्णू तायडे संजय भगत नाना बाविस्कर तसेच कास्ट्राईब संघटनेच्या विविध शाखांचे पदाधिकारी यांच्या समवेत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अनिल डी गाढे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 

Protected Content