जळगाव प्रतिनिधी । राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले असून ते बोरखेडा येथील पिडीत कुटुंबाच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असून ते शनिवारी जिल्ह्यात येत आहेत. ते बोरखेडा येथे पिडीत कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काल रात्री दिली होती. तर आज सकाळी त्यांच्या दौर्याचा तपशील प्रशासनाने जाहीर केला होता.
या अनुषंगाने ना. अनिल देशमुख यांचे जळगाव येथील विमानतळावर आगमन झाले असून ते शासकीय वाहनाने रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे पिडीत कुटुंबाच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.