रावेर-यावलमधून परिवर्तन महाशक्तीकडून अनिल चौधरींना उमेदवारी जाहीर

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांना प्रहार जनशक्ती पक्षाने रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. ते परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

 

भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी यावल रावेर विधानसभा मतदारसंघातून कधीपासूनच तयारी सुरू केलेली आहे. आज परिवर्तन महाशक्ती आघाडीने १० उमेदवारांची यादी जाहीर केली. या पहिल्याच यादीत अनिल छबिलदास चौधरी यांना रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे अचलपूर या आपल्या पारंपारिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रावेर यावल विधानसभा मतदारसंघातून सर्वात पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीने शमीभा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर कालच भारतीय जनता पक्षाने पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर आता अनिल चौधरी यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदार शिरीषदादा चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांना देखील तिकीट मिळण्याची अपेक्षा आहे. अशा पद्धतीने या मतदारसंघातून चौरंगी लढत रंगणार असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. तर इतर उमेदवार देखील आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची देखील शक्यता आहे. म्हणजेच या मतदारसंघातून बहुरंगी लढत होणार आहे.

Protected Content