मुंबई वृत्तसंस्था । प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालकपदाचा (दि.१६) राजीनामा दिला आहे. आरकॉम कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. यातूनच अनिल अंबानी यांच्यासोबत छाया विराणी, रायना करानी, मंजरी केकर, सुरेश रंगाचार यांनी देखील संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
शनिवारी रेग्युलेटरी फाइलिंग मिटिंगमध्ये याबाबत त्यांनी घोषणा केली. जुलै ते सप्टेंबर या तिमाहित कंपनीला ३०,१४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे रिलायन्स कम्युनिकेशनच्या संपत्तीचा लिलाव होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.