जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील रामेश्वर कॉलनी, हनुमान नगर, रेणुका नगर आणि मेहरूण परिसरातील स्थानिक महिलांनी शुक्रवारी १० जानेवारी दुपारी ४ वाजता महापालिका कार्यालयात धडक दिली. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आणि प्रशासनावर जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान दालनात अधिकारी उपस्थित नसल्याने महिलांनी रोष व्यक्त केला.
जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील रामेश्वर कॉलनी, हनुमान नगर, रेणुका नगर आणि मेहरूण या भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाही. यामध्ये रस्ता, गटारी, पिण्याचे पाणी, घंटागाडी तसेच परिसरात स्वच्छता होत नसल्याची तक्रार करण्यात आले होते. या समस्या महापालिकेने सोडविले नसल्याने या परिसरातील स्थानिक नागरीक व महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी स्थानिक नागरीकांन जळगाव महानगरपालिकेत अनेक वेळा तक्रार, निवेदने, आंदोलने आणि उपोषण केली परंतू प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या महिलांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांशी भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आयुक्तासह इतर विभागातील जबाबदार अधिकारी दालनात उपलब्ध नसल्याचे दिसून आले त्यामुळे संतप्त महिलांनी थेट महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वाराला कूलूप ठोकून महापालिका प्रशासनाच्या विरोध विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले.