जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहन टॉकीज परिसरात उधारीचे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका तरूणाला छातीत बेदम मारहाण केली तर लोखंडी पाईप डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मोहन टॉकीज परिसरात गौरव सुभाष सोनवणे वय २९ हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याने विनोद भावलाल सोनवणे याला धारीने पैसे दिले हाते. गुरूवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता उधारीचे पैसे घेण्यासाठी विनोद सोनवणे याच्या घरी गेला. त्यावेळी गौरव सोनवणे याने उधारीचे पैसे मागितले याचा राग आल्याने विनोद सोनवणे याने शिवीगाळ करत आधी छातीवर मारहाण केली. त्यानंतर लोखंडी पाईप डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या तरूणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री १० वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या गौरव सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.