मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज आढळून आले असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
गेल्या १८ दिवसांपासून शिवसेनेची भूमिका अतिशय प्रखरपणे मांडणारे पक्षाचे खासदार तथा दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हृदयाची अँजिओग्राफी केल्यानंतर दोन ब्लॉकेज आढळून आले. यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत खासदार संजय राऊत यांच्या बंधूंनी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती दिली.