चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तळेगाव शिवारात शेती कशासाठी दुसऱ्याला दिली याचा राग आल्याने दोन जणांनी एका शेतकऱ्याला लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची तमकी दिल्याची घटना १२ जून रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. या प्रकरणी सोमवार १७ जून रोजी दुपारी १ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र यादव मांडे वय-४९, रा. शिंदे ह. मु. तळेगाव शिवार ता. चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात त्यांनी त्यांची शेती ही कशासाठी दुसऱ्याला दिली याचा रागातून गावात राहणारे सुधीर यादव मांडे व शारदा सुधीर मांडे या २ जणांनी १२ जून रोजी सायंकाळी ७ वाजता शेतात असताना लोखंडी सळईने रवींद्र मांडे यांना मारहाण केली, तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान या घटनेबाबत रवींद्र मांडे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार सोमवारी १७ जून रोजी दुपारी १ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सुधीर मांडे आणि त्यांची पत्नी शारदा मांडे या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास कॉन्स्टेबल विकास चव्हाण करीत आहे.