अंगणातील उभी कार चोरट्यांनी लांबविली; एमआयडीसीत गुन्हा

car news

जळगाव प्रतिनिधी – लोखंडी पाईपच्या साहाय्याने सुरुवातील खिडकीत टांगलेली पॅन्टमधून चाबीने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची अंगणात उभी कार चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान चोरट्यांनी पॅन्टच्या खिशातील 4 हजाराची रोकड काढून पॅन्ट अंगणात टाकून पोबारा केल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत माहिती अशी की, खेडी शिवारात शांताराम पाटील शाळेसमोर प्लॉट नं 12, सर्व्हे नं 03 येथे स्वप्निल रामचंद्र पवार रा. खेडी शिवार हे वडील, आई, पत्नी, भाऊ, वहिणी याच्यासह वास्तव्यास आहे. एमआयडीसीत नवीन गुरांचे बाजारासमोर त्यांचे एस.पी.रोडलाईन्स या नावाचे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचे भाऊ जैन इरिगेशनमध्ये नोकरीला असून त्यांची बदली दिल्ली येथे झाली आहे. तेव्हापासून स्वप्निल पवार हे भावाच्या मालकीची कार (क्र एम.एच.19.बी.जे.9977 ही स्वतः वापरत आहेत. 6 डिसेंबर रोजी पवार यांचे औरंगाबाद येथून त्यांचे मित्र भिकन सोनवणे आले. त्याच्यासोबत हॉटेलात जेवण करुन पवार यांनी रात्री 11.30 वाजेच सुमारास कार नेहमीप्रमाणे घरासमोर पार्किंग केली. हॅन्डल लॉक करुन चाबी पॅन्टच्या खिशात ठेवून झोपून गेले.

चोरट्यांनी लोखंडी पाईपच्या सहाय्याने बेडरुममध्ये हँगरला लटकवलेली पॅन्ट काढली. या पॅन्टच्या खिशात कारची चाबी होती ती मिळविली. यानंतर पॅन्टमधील चार हजाराची रोकडही काढून घेत, पॅन्ट अंगणात टाकून दिली. तसेच मिळविलेल्या चाबीच्या सहाय्याने कारचे लॉक उघडून कार घेवून पोबारा केला. पवार सकाळी उठले असता, त्यांना पॅन्ट अंगणात तर लोखंडी पाईप खिडकीला लावलेला दिसला. यानंतर कारचोरीचा प्रकार समोर आला.

पवार यांना कार दिसून न आल्याने त्यांनी आजूबाजूला परिसरात कारचा शोध घेतला मात्र मिळून आली. अखेर त्यांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. खेडी पेट्रोलपंपाजवळ असलेल्या बिर्ला सिमेंट व आसारीचे दुकानाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात 7 रोजी पहाटे 3.33 वाजेच्या सुमारास कार अजिंठा चौफुलीकडे जात असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी स्वप्निल पवार यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2 लाखांची कार, पॅन्टमधील 4 हजार रुपये रोख तसेच पॅनकार्ड असा 2 लाख 4 हजाराचा ऐवज लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Protected Content