…आणि अंगणवाडी सेविकांनी परत केला मोबाईल हँडसेट !

चोपडा प्रतिनिधी | राज्य शासनाने दिलेला मोबाईल हँडसेट हा तकलादू असून यातून पूर्ण कामे होत नसून पोषण आहाराचे ऍप इंग्रजीत नसल्याने त्रस्त अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

याबाबत वृत्त असे की, सध्या बहुतांश कामे हे स्मार्टफोनच्या माध्यमातून होत असून राज्य शासनाचे विविध विभागदेखील अद्ययावत बनले आहेत. यात ग्रामीण भागातील महत्वाचा घटक असणार्‍या अंगणवाडी सेविकांनाही सरकारतर्फे मोबाईल हँडसेट प्रदान करण्यात आला असून याच्या माध्यमातून विविध योजनांच्या अंमलबजावणीचा डाटा फिड करण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र अंगणवाडी सेविकांना दिलेला मोबाईल हा फक्त दोन जीबी रॅमचा असून तो वारंवार हँग होत असतो. यातच पोषण आहाराचे ऍप हे इंग्रजीत असून यात माहिती फिड करावी लागत आहेत. बर्‍याच अंगणवाडी सेविकांना या ऍपमध्ये माहिती भरणे अवघड होऊ लागले आहे. या संदर्भात अनेकदा तक्रारी करून देखील दखल घेण्यात आलेली नाही. याचा निषेध करण्यासाठी आज चोपडा येथे अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलन करून शासनाचा निषेध केला. 

या आंदोलनाच्या अंतर्गत आयटकशी संलग्न असलेल्या अंणवाडी कर्मचारी युनियनने आज जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर सर्व सेविकांनी आपल्याकडे असणारा शासकीय मोबाईल हँडसेट जमा करून तो शासनाला परत केला. यापुढे सर्व कामे ही रजिस्टरमध्ये नोंद करू करण्यात येणार असल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे.

 

Protected Content