यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्याचे माजी पाटबंधारे मंत्री व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शेळगाव बॅरेज या मध्यप्रकल्पास भेट दिली. याप्रसंगी १९९९ साली आमदार एकनाथराव खडसे हे राज्याचे पाटबंधारे मंत्री असतांना तापी खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून तापी नदीवर पाच बॅरेजेसला मंजुरी देण्यात आली होती. त्यातच शेळगाव बॅरेजचा देखील समावेश होता. भूमिपूजन करते वेळी शेळगाव बॅरेज या प्रोजेक्टची किंमत सुमारे १९८ कोटी रुपये होती परंतु काम संथगतीने झाल्याने सदर प्रकल्पाची किंमत साधारण ०८ ते ०९ हजार कोटी पर्यंत गेली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सदर प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी अनेक लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करून निधी मंजूर करून आणला होता.
आज या प्रकल्पास्थळी भेट दिल्यानंतर मनाला मानसिक आनंद झाला असून मी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास आल्याचा आनंद आहे. सदरचे या प्रकल्पाचे कामा ९०% टक्के पूर्णत्वास आल्यामुळे यावल, भुसावळ व जळगाव तालुक्यातील शेतीला व सिंचनासाठी उपयोग होणार आहे. शेतकऱ्यांना या प्रकल्पावरून खाजगी लिफ्ट तसेच सहकारी तत्त्वावर पाणी उपसा योजना कार्यान्वित करता येणार असून त्याचबरोबर या भागांमध्ये मत्स्यउद्योग तसेच पर्यटनाला चालना मिळणार असून हा संपूर्ण भाग सुजलाम सुफलाम होणार आहे. त्याचबरोबर या शेळगाव प्रकल्पामुळे यावल नगरपरिषद तसेच भुसावळ नगरपरिषद व एमआयडीसी जळगाव व चोपडा मतदारसंघातील यावल तालुकासह अनेक भागांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून या भागास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व आमदार एकनाथराव खडसे यांनी केले. याप्रसंगी त्यांचे समवेत यावल येथील माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील, यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष शेख असलम,रावेर येथील सुनील कोंडे, रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश महाजन,राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किशोर माळी,प्रा सुनिल नेवे,जळगांवचे माजी नगरसेवकसुनिल माळी, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष रिंकू चौधरी यांसहअन्य कार्यकर्ते उपस्थित होते.