जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेरूळावर हावडा अहमदाबार एक्सप्रेसचा धक्का लागल्याने जखमी झालेल्या अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव रेल्वे पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार, जळगाव रेल्वे स्टेशनवरील अपलाईवरून जाणाऱ्या गाडी क्रमांक १२ ८३४ हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसचा जोरदार धक्का लागल्याने अंदाजे २५ वर्षीय अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास रेल्वे खंबा क्रमांक ४२०च्या १२ आणि १४च्या दरम्यान घडली आहे. ही घटना घडल्यानंतर ऑन ड्यूटीवर असलेले DYSS रोगडे यांनी जळगाव रेल्वे पोलीसात माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी सचिनकुमार भावसार यांनी घटनास्थळी घाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन भावसार करीत आहे.