धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील भोणे गावाजवळील रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अंदाजे ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १८ जून रोजी रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी १९ जून रोजी मध्यरात्री २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील भोणे रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे खंबा क्रमांक २६९ च्या १९ आणि २० च्या मध्ये एका अनोळखी अंदाजे ४० वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १८ जून रोजी रात्री ११,३० वाजता उघडकीला आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार खुशाल पाटील हे करीत आहे.




