Home क्राईम धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्यामनगर येथे धावत्या रेल्वेसमोर उभे राहून एका अनोळखी ४० ते ४५ वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील श्याम नगर येथील रेल्वे रुळावर सोमवारी १८ नोव्हेंबर दुपारी २ वाजता श्यामनगर ते गुरुदत्त कॉलनी दरम्यान असलेल्या रेल्वे खांबा क्रमांक ४१५/२१-२३च्या मध्ये हा घडली. यात मयताचा चेहरा चेंदामेंदा झाला असून त्याची ओळख पटू शकली नाही. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound