Home क्राईम रेल्वेस्थानकावर आढळला अनोळखी मृतदेह

रेल्वेस्थानकावर आढळला अनोळखी मृतदेह

0
38

जळगाव प्रतिनिधी | शहरातील रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक पाचवर सुमारे ५५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली.

यावेळी स्टेशन प्रबंधकांनी याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली असून त्यांनी तो मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला आहे.

त्या अनोळखी उंची ५.५ इंच इतकी असून रंग सावळा आहे. त्याने पांढर्‍या रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तसेच त्याच्या उजव्या हातावर चांदणीसारखे गोंदलेले असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

याप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास अनिल नगराळे हे करीत आहेत.


Protected Content

Play sound