वृध्द महिलेला पोटच्या मुलासह सून व नातवाकडून बेदम मारहाण !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील आईवडीलांनी शेती निम्मेहिस्स्याने दिल्याच्या कारणावरून पोटच्या मुलासह सुन व नातवाकडून ६५ वर्षीय म्हतारी आईला लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी २ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात मुलासह सून व नातू या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमनबाई निंबा पाटील वय-६५ या वृध्द महिला आपल्या पती निंबा पाटील यांच्यासह अमळनेर तालुक्यातील गडखांब गावात वास्तव्याला आहेत. त्यांचा मुलगा मनोहर निकम पाटील, अर्चना मनोहर पाटील आणि ओम मनोहर पाटील हे गावातच वेगळे राहतात. दरम्यान निंबा पाटील यांनी त्यांच्याजवळील शेती ही निम्मे हिस्स्याने गावातील एकाला दिली आहे. या रागातून मुलगा मनोहर पाटील हा पत्नी व मुलासह निंबा पाटील यांच्या घरी आला. त्यावेळी घरात सुमनबाई निंबा पाटील ह्या घरात एकट्याच होत्या. शेती निम्मे हिस्स्याने दिल्याच्या रागातून मुलगा मनोहर पाटील, सुन अर्चना पाटील आणि नातू ओम पाटील या तिघांनी शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी वृध्द महिला सुमनबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा मनोहर निकम पाटील, अर्चना मनोहर पाटील आणि ओम मनोहर पाटील सर्व रा.गडखांब ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई हे करीत आहे.

Protected Content