जून्या वादातून तरूणावर धारदार शस्त्राने वार; चौघांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील आर.के.लॉन परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणला चॉपर, फायटरसह लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीरदुखापत केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी ७ जून रोजी रात्री १०.३० वाजता घडली होती. याप्रकरणी शनीवारी ८ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, रितेश राहूल राजपूत वय १८ रा. नेताजी चौक, चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ७ जून रोजी रात्री १०.३० वाजता रितेश राजपूत याला आर.के. लॉन परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून हर्षल रामू गवळी, प्रणव गवळी, वैभव सोनार आणि अनिकेत गवळी सर्व रा. चाळीसगाव यांनी चॉपर, फायटर आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. यात जखमी झालेल्या रितेश राजपूत याला चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर शनिवारी ८ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाटील हे करीत आहे.

Protected Content