भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील उड्डाणपुलावर भरधाव ट्रकच्या धडकेत रिक्षातील ७० वर्षीय जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता घटना घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रमेश बाबुलाल सारसर वय-७०, रा. उमाडी तालुका मलकापूर जि.बुलढाणा असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी कीच रमेश सारासर हे आपल्या परिवारास वास्तव्याला आहे. दरम्यान ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ते रिक्षाने भुसावळकडून दीपनगर येथे रिक्षाने प्रवास करत असताना समोरून येणारा ट्रकने त्यांच्या रिक्शाला जोरदार धडक दिली. या धडकेत रमेश सारासर हे वृद्ध जखमी झाले. त्यामुळे त्यांना तातडीने भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल योगेश पालवे हे करीत आहे.