जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ रिक्षाने पायी जाणारा वृध्दाला जोरदार धडक दिली होती. या अपघात प्रकरणी शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता अज्ञात रिक्षा चालकावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोपट बाबुराव भोजने (वय-६८) रा.जोशी कॉलनी जळगाव असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोपट भोजने हे आपल्या परिवारासह जोशी कॉलनी परिसरात वास्तव्याला आहे. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोपट भोजने हे जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोरील रस्त्यावरून घरी पायी जात होते. त्यावेळी त्यांना मागून भरधाव रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योती मालवली. या अपघातप्रकरणी त्यांचा मुलगा दीपक पोपट भोजने (वय-३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता अज्ञात रिक्षा चालकावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहे.